|
मूल्ये
प्रामाणिकपणा- साधेपणा
(गांधी फिल्म प्रतिष्ठानचा उपक्रम) |
महात्मा गांधीनी आयुष्यभर प्रामाणिकपणा, करुणा, अहिंसा, साधेपणा, सचोटी याचा उपदेश केला व त्यांनी स्वत: त्याप्रमाणे आचरण केले. सत्याच्या जवळ जाण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, असे ते म्हणाले होते. सत्यमेव जयते!! ही मूल्ये रुजावीत, जगाने मानवतेचा अंगीकार करावा यासाठी आम्ही गांधी फिल्म प्रतिष्ठानतर्फे शालेय विद्यार्थ्यांचा एक मेळावा आयोजित केला आहे. ही मुले गांधीजींचे विचार सोदाहरण स्पष्ट करतील आणि २ ऑक्टोबर या गांधीजींच्या जन्मदिनी त्या मूल्यांचे आयुष्यात पालन करण्याची प्रतिज्ञा घेतील. |
|
कार्यक्रम: 'प्रामाणिकपणा व साधेपणा' ही दोन मुल्ये म्हणजे महात्मा गांधींच्या विचारांचे सार होय. १ ऑक्टोबर, २०१४ला दुपारी विविध शाळांमधील सुमारे ३०० मुले मुंबई विद्यापीठाच्या फोर्टमधील दीक्षांत सभागृहात जमतील आणि या दोन मुल्यांपैकी एकावर चित्र काढतील. प्रामाणिपणाची प्रतिज्ञा: चित्र काढण्याच्या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना शपथ दिली जाईल की "ते आयुष्यभर प्रामाणिकपणे वागण्याचे महात्मा गांधींना वचन देत आहेत. " व अशा प्रतिज्ञापत्रांचे विनामूल्य वाटप केले जाईल. |
|
ही स्पर्धा नव्हे किंवा त्यात भाग घेण्यासाठी कोणतीही प्रवेश फी नाही. प्रामाणिकपणा किंवा साधेपणा या विषयावर नावीन्यपूर्ण किंवा कुठलेही चित्र विद्यार्थी काढू शकतात. सचोटी, साधेपणा, अहिंसा हे शब्द किंवा 'महात्मा गांधी' हे नाव नाविण्यपुर्ण कॅलिग्राफीमध्ये लिहिणे हे सुध्दा चालेल. |
|
सर्वात महत्वाचे विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा/ सचोटी व साधेपणा या विषयांवर आपल्या पालक, भाऊ, बहिण, मित्र, शिक्षक यांच्याशी चर्चा करावी अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना प्रामाणिकपणा, सचोटी या मूल्यांबद्दल नेमके काय वाटते... या अन् अशा असंख्य प्रश्नांवर मुलांना चित्रातून 'बोलते' करण्यासाठी गांधी फिल्म फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. एकुणचं विद्यार्थ्यांचा महात्मा गांधींच्या मूल्यांशी परिचय व्हावा हा हेतू आहे. |
|
जोडून घ्या फाऊंडेशनला ही विनंती: संपुर्ण देशातील शाळांनी चित्रे काढणे, वक्तृत्व, वाद-विवाद, निबंध लेखन किंवा महात्मा गांधींच्या मूल्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करुन देणारा कोणताही कार्यक्रम आयोजित करावा अशी आमची नम्र विनंती राहील. शांळांनी कुठलाही कार्यक्रम २ ऑक्टोबर २०१४ ते ३० जानेवारी २०१५ या दरम्यान कोणत्याही दिवशी करावा असे आवाहन गांधी फाऊडेशनचे चेअरमन नितीन पोतदार यांनी केले आहे. गांधी फिल्म फाऊंडेशन यासाठी शाळांना आनंदाने मोफत मार्गदर्शन करेल व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रतिज्ञापत्रांचे विनामूल्य वाटप करेल असे त्यांनी कळविले आहे. |
|
तसेच फाऊडेंशन तर्फे महात्मा गांधींची काही निवडक छायाचित्र तयार करण्यात आलेली आहे, त्यांचे विविध आकारात प्रिंट्स अल्प किंमतीत उपल्बद करुन देण्यात येणार आहे, त्या साठी गांधी फाऊंडेशनशी संपर्क साधावा. |
|
अधिक माहितीसाठी गांधी फिल्म फाऊंडेशनचे श्री. जयकर किंवा प्रतिभा यांच्याबरोबर शाळांनी संपर्क करावा. फोन ०२२-२३८०४६८१ ( सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान). ईमेल: |
|
आपला
नितीन पोतदार
चेअरमन, गांधी फिल्मस फाऊंडेशन |
|